या राशींची आज आर्थिक भरभराट होणार ; पहा आजचे राशिभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर ।

मेष:-
आज तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली गोष्ट समोर येऊन ठेपेल. भौतिक सुखाचा आनंद घ्याल. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला. गरजूंना मदत कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

वृषभ:-
आज कौटुंबिक वादात पडू नका. कोणतेही वचन देताना सावध रहा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. बचतीकडे लक्ष द्यावे. नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे.

मिथुन:-
आज आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करावा. निर्णय तुमच्या बाजूचा असेल. मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या. व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा. ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल.

कर्क:-
आज आपल्या मर्जीप्रमाणे वागाल. दिवस कलासक्त असेल. वरिष्ठांना खुश कराल. मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतात. काही अनपेक्षित बदल दिसून येतील.

सिंह:-
आज मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. अधिकाराची अंमलबाजावणी करावी. वैचारिक स्थिरता ठेवावी. पायाची दुखणी संभवतात. विद्यार्थांचे प्रश्न सुटतील.

कन्या:-
आज व्यवसायिकांना लाभदायक दिवस. मनातील इच्छा पूर्ण कराल. सर्व गोष्टीत आनंद वाटेल. बोलतांना सांभाळून शब्द वापरा. नातेवाईकांना नाराज करू नका.

तूळ:-
आज आपल्याच मतावर अडून राहाल. इतरांच्या बाजूचा देखील विचार करावा. वागण्यातून अति स्पष्टता दर्शवू नका. कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात. कामाची धांदल राहील.

वृश्चिक:-
आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मैत्रित गैरसमज होण्याची शक्यता. डोकेदुखीचा त्रास संभवतो. पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल.

धनू:-
आज जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा. संभ्रमित असताना निर्णय घेऊ नका. दिवस मध्यम फलदायी. वैचारिक स्थिरता ठेवावी. नियमांना तडा जाऊ देऊ नका.

मकर:-
आज लहान आजरांकडे लक्ष ठेवा. चालढकल करू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. चारचौघात कौतुक होईल.

कुंभ:-
आज भागीदारीत फार विसंबून राहू नका. बोलतांना आपले मत शांतपणे मांडा. नवीन उत्पादने घेऊ शकाल. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. सरकारी योजनांचा लाभ घ्या.

मीन:-
आज स्थावर संबंधी योजनांना चालना द्याल. अतिघाईत निर्णय घेऊ नका. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल. व्यावसायिक विकास शक्य होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *