नववर्षात या राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर ।देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगणाला भिडले असतानाच झारखंड सरकारने पेट्रोलवर प्रति लिटर 25 रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज केली.

सोरेन म्हणाले, अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाटय़ाने वाढल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांबरोबरच सर्वसमान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला फायदा मिळावा, या हेतूने झारखंड सरकारने पेट्रोलच्या दरात सूट देण्याची योजना आणली आहे.

झारखंड पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटचे दर कमी करण्याची मागणी सतत करत होती. व्हॅटचा दर 22 टक्के वरून 17 टक्क्यांपर्यंत कमी केल्यास लोकांना मोठा दिलासा मिळेल, अशी त्यांची मागणी होती. कारण झारखंडहून धावणारी वाहने शेजारच्या राज्यांमधून डिझेल भरत आहेत. ज्यामुळे राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे. झारखंडमध्ये 1350 पेट्रोल पंप आहेत जे थेट 2.50 लाखाहून अधिक कुटुंबांना उपजीविका प्रदान करतात. व्हॅटच्या उच्च दरांमुळे व्यवसायावरही परिणाम होत होता. त्यामुळे झारखंड सरकारने नववर्षात पेट्रोलचा दर प्रति लिटर 25 रुपये स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *