महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० डिसेंबर । पिंपरी । म्हाडा मोरवाडी अजमेरा – मासुळकर काॅलनी येथील सामाजिक कार्यकर्ते मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासन व महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात असलेल्या विविध शासकीय अनुदान योजनेची माहिती व मार्गदर्शन शिबीर मोरवाडीतील कापसे उद्यान हाँल मध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ मोरवाडीचे अध्यक्ष श्री माडगूळकर सर होते पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष श्री आनंद बनसोडे यांनी विविध शासकीय योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन केले त्यानी आजपर्यंत १५० ते २०० निराधार , दिव्यांग व अपंग यांना योजनांचा लाभ मिळवून दिला या शिबीरात परिसरातील ६५ ते ७० निराधार , दिव्यांग व अपंगानी सहभाग घेतला त्यात ५५ ते ६० नागरिकांना त्याच्या कडील उपलब्ध कागद पत्रमुळे लाभ मिळू शकतो हा लाभ मिळवून देण्यासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार श्री आण्णासाहेब बनसोडे व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष यांच्या सहकार्यातून व श्री दिपक भोजने यांच्या प्रयत्नातून करणार आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री प्रविण भोसले , साईनाथ काबळे सो. रेणुका भोजने यांनी प्रयत्न केले सामाजिक कार्यकर्त्यां शमा सय्यद श्री प्रा.दत्तात्रय कोकाटे श्री पाटील उपस्थित होते श्री रजनीकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले सौ. रेणुका भोजने (गजबरे )आभार मानले.