महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ जानेवारी । भोसरी :- दिघी येथील मातृछाया अनाथ बालक आश्रमात म्हाडा मोरवाडी येथील भोजने कुटुंबाने केला आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा म्हाडा मोरवाडी अजमेरा मासुळकर येथील सामाजिक कार्यकर्त मल्हार आर्मी शहर अध्यक्ष श्री दिपक भोजने हे नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्याचे जन्म दिन व लग्नाचे वाढदिवस वेग वेगळ्या उपक्रमा द्वारे करत असतात करोनाच्या काळात कु. भूमी दिपक भोजने हिचा वाढदिवस म्हाडा मोरवाडीतील सोसायटी मधील सुरक्षा रक्षक यांना माक्सचे वाटप करण्यात आले तसेच त्याच्या लग्नाच्या वाढदिवसी गरजु कुटुंबास रेशन वाटप करण्यात आले होते नुकताच श्री दिपक भोजने यांचा वाढदिवस राज्य शासन व महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या अनुदान योजनांचे माहिती व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
दि. १|१|२०२२ रोजी चिं. निरज दिपक भोजने यांचा वाढदिवस दिघी तेथील मातृछाया अनाथ बालक आश्रमात रोजच्या गरजेच्या वस्तू गहू , तांदूळ, तेल , सोयाबीन , पोहे , दाळ , साखर बिस्किटे व इतर साहित्य देण्यात आले तेथील सर्व मुलांना सौ. रेणुका भोजने यांनी औक्षण केले व केक कापण्यात आला श्री दिपक भोजने व त्यांचे कुटुंब या भागात नेहमीच विविध सामाजिक कार्य करत असतात श्री दिपक भोजने व श्री विजय भोजने उप अभियंता पि.चि.महानगरपालिका समाजात कार्यरत असतात यांची प्रेरणा घेऊन निरजने त्याचा वाढदिवस अनाथ बालक आश्रमात साजरा करण्याचे ठरविले यावेळी मातृछाया अनाथ बालक आश्रमाचे संस्थापक, कु .भुमी भोजने, रेणुका भोजने दिपक भोजने , आश्रमातील विद्यार्थी उपस्थित होते.