IND vs SA : जोहान्सबर्गमध्ये इतिहास घडवण्याची टीम इंडियाला संधी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .3 जानेवारी । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील दुसरी टेस्ट आज (सोमवार) सुरु होणार आहे. जोहान्सबर्गच्या द वाँडर्स स्टेडियमवर (Johannesburg Wanderers stadium) ही टेस्ट होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे ही टेस्ट जिंकून दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी टीम इंडियाला आहे.

भारतीय बॉलर्सनी सेंच्युरियन टेस्टमध्ये दमदार कामगिरी केली होती. त्यांनी आफ्रिकेला पहिल्या इनिंगमध्ये 197 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 191 रनवर रोखले. या टेस्टमध्येही बॉलर्सकडून त्याच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असेल. टीम इंडियाची मिडल ऑर्डर फारशी फॉर्मात नाही. विराट कोहलीसह (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर मोठ्या खेळीचा दबाव आहे. केएल राहुलनं (KL Rahul) सेंच्युरियनमध्ये शतक रचत विजयाचा पाया रचला होता. राहुल आणि मयंक या ओपनिंग जोडीवर या टेस्टमध्येही मोठी जबाबदारी आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी पहिल्या टेस्टमध्ये कमबॅक केले होते. लुंगी एन्गिडी आणि कागिसो रबाडाने भारतीय बॅटर्सना त्रस्त केले होते. आता सीरिज वाचवण्यासाठी त्यांना आणखी जोरदार कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर आफ्रिकेच्या बॅटर्सनीही चांगले योगदान दिले तर टीम इंडियाची अडचण वाढू शकते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *