महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ जानेवारी । राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना मुंबई पुण्यासाठी नवी नियमावली जारी करण्यावर चर्चा सुरू आहे. तिसऱ्या लाटेची सुरुवात होत असताना पुन्हा ही दोन शहरं हॉटस्पॉट ठरू शकतात. यापार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor) यांनी पत्रकार परिषद घेतली. पुण्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून महानगरपालिका आणि राज्य शासनातर्फे रुग्णांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली. उद्या (ता.४ जाने) पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर नवी नियमावली जाहीर होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. (Pune Lockdown Restrictions)
महापौरांचे महत्वाचे मुद्दे
– गेले काही दिवसात पुण्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत याचा आढाव घेतला.
– २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान कोरोना रुग्ण झपाट्याने वाढले
– गेले आठ दिवसांत चौपाटीने कोरोना रुग्ण संख्या वाढली
– एकूण जवळपास रोज ८० ते ८५ टक्के दोन्ही डोस घेतलेले लोक कोरोना बाधित आहे. सौम्य लक्षण आहेत पण दोन्ही डोस झालेल्या लोकांत कोरोना होतोय.
– २५०० कोरोना रुग्णापैकी ३४६ रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत बाकी नॉर्मल आहे.
– ४००० हजार रॅमिडिसिव्हीर शिल्लक आहेत १८०० बेड ९५०० लिटर पर मिनिटं ऑक्सिजन तयार होतो.
– जम्बो हॉस्पिटलमध्ये ही तयारी आहे सर्व तयारी म्हटलं तर आठवड्यात करू शकतो
– १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू केलं आहे,आज २ लाख मुलांना ७८ हजार डोस देत आहोत
– ऑक्सिजन बेड अन हॉस्पिटल संख्या वाढवू शकतो,भरारी पथक करून आता नियम आहेत ते कडक पाळण्याचा प्रयत्न काही ठिकाणी हलगर्जीपणा पणा केला जातोय तिकडे तपासणी केली जात नाही हॉटेल विमानतळ इतर गर्दी ठिकाणी नियम पाळले जावेत.
– उद्या पालकमंत्री अजित पवार याच्या उपस्थितीत बैठक होणार त्यात अजून नवीन काही नियम निर्णय होतील.
– शाळाबाबत ऑनलाईन करण्याबाबत निर्णय घेतला जावा पालकांची भूमिका
– पुण्यात 3 लाख लोक असे ज्यांनी फक्त एक डोस घेतला…हे नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. त्याच्याशी संपर्क करतोय