महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । गोव्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी गोव्यातील राजकारणाला वेग आला आहे. गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची गोव्यात काल महत्त्वपूर्ण चर्चा झाली.