कोरोनाचा फटका ; खासगी कंपन्या पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’च्या वाटेवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । ओमायक्रोन व्हेरिएंटने आणलेल्या कोरोनाच्या तिसऱया लाटेचा फटका कॉर्पोरेट जगतालाही बसण्यास सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच कर्मचाऱ्यांसाठी उघडण्यात आलेले ऑफिसेसचे दरवाजे पुन्हा बंद झाले आहेत. अनेक खासगी कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ला प्राधान्य दिले असून कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्यास सांगितले आहे. आता एप्रिलनंतरच अनेक ऑफिसेस कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा उघडली जाणार आहेत.

फॉर्मा कंपनी सिप्लाने गेल्याच आठवडय़ात कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याआधी आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंडनेही वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले होते. आरपीजी ग्रुप, डाबर इंडिया, मैरिको, फ्लिपकार्ट, पारले आणि मेक माय ट्रीपने कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या सर्व कंपन्यांमध्ये पुढील काही महिने वर्क फ्रॉम होम, 50 टक्के कर्मचारी क्षमता असे काही उपाय केले जाणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *