महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेला सुरुवात झालेय. काल तुळजाभवानी मातेला चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात आलं. धुपारती करून घुगऱ्यांचा नैवेद्य देवीला दाखवण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी, महंत, मंदीर कर्मचारी हे सर्वजण उपस्थित होते. त्यानंतर प्रक्षाळपूजा करून मंदिर बंद करण्यात आलं. मंचकी निद्रा कालावधीत कुलधर्म कुलाचार करणे वर्ज्य असल्यानं या काळात मंदिरात भक्तांची संख्या कमी असते. मंदिराचे पुजारी देखील या काळात गादी-उशीचा त्याग करून केवळ सतरंजीवर विश्रांती करतात.