महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । सांगली पाठाेपाठ आता सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री जंगली गव्याने फेरफटका मारला. हा गवा सुमारे तासभर परिसरात फिरत होता. या गव्याचे चित्रीकरण सीसीटीव्हत कैद झाले आहे. bison enters in mahableshwar market satara latest marathi news
महाबळेश्वर (mahableshwar) परिसरात घनदाट जंगल आहे. येथे अनेक प्रकारचे पशू पक्षी आहेत. जंगलाचा भाग साेडून ते कधीच शहरात येत नाहीत. परंतु मध्यरात्री एक गवा (bison) बाजारपेठेत घुसला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या गव्याची माहिती मिळताच स्थानिकांनी वनविभागास कळविले. वनविभागाचे पथक घटनास्थळी आले. त्यांनी गव्यास नजीकच्या जंगलात हुसकावून लावले. यामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. पहिल्यांदाच गव्याचा फेरफटका बाजारपेठेत झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.