Omicron – ओमायक्रॉन महामारीचा खात्मा करणार, 60 दिवसांत जग पूर्वपदावर येणार; विषाणूतज्ज्ञांचा दावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ जानेवारी । जगभरात ओमायक्रॉन या कोरोनाच्या बदललेल्या रुपाने थैमान घातले आहे. याची लागण अतिशय झपाट्याने होत असून कोरोनाग्रस्तांची संख्या अत्यंत वेगाने वाढायला लागली आहे. हिंदुस्थानात ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार असल्याची भीती वर्तवण्यात येत असून त्याचा मुकाबला करण्यासाठी शक्य ते सगळे उपाय केले जात आहेत. एकीकडे हे चिंतेचे वातावरण असताना डेन्मार्कच्या तज्ज्ञ टायरा ग्रोव्ह क्राऊस (Tyra Grove Krause) यांनी हाच ओमायक्रॉन विषाणू महामारीचा अंत करेल असं भाकीत वर्तवलं आहे. क्राऊस या डेन्मार्कच्या सिरम इन्स्टीट्यूटच्या प्रमुख साथरोगतज्ज्ञ आहेत. जानेवारीच्या शेवटापर्यंत बहुसंख्य देशात ओमायक्रॉनग्रस्तांचा आकडा कळस गाठेल आणि नंतर हळूहळू हा आकडा घसरायला लागेल असं त्यांनी म्हटलंय.

ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असला तरी त्यामुळे बाधित लोकांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. ही चांगली बाब असून यामुळे लोकांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होत असल्याचे क्राऊस यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. परंतु याची लक्षणे सौम्य स्वरुपाची असल्याचे दिसले आहे. ओमयाक्रॉनमुळे नैसर्गित प्रतिकारशक्ती वाढवण्याची आशा असल्याचे क्राऊस यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *