अ‍ॅशेस मालिका : इंग्लंडची प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । सलग तीन सामने गमावल्यावर उर्वरित दोन लढतींमध्ये प्रतिष्ठा जपण्याच्या निर्धाराने इंग्लंडचे खेळाडू मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातील चौथा अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट सामना बुधवारपासून सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जायबंदी ट्रेव्हिस हेडच्या ऐवजी ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजाला संधी दिली असून जोश हेझलवूड अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने गेल्या लढतीचा सामनावीर स्कॉट बोलंडचे संघातील स्थान कायम आहे.

दुसरीकडे जो रूटने इंग्लंड संघात एक बदल केला असून दुखापतग्रस्त ओली रॉबिन्सनच्या जागी स्टुअर्ट ब्रॉडचे संघात पुनरागमन झाले आहे. मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड यांना करोना झाल्याने ग्रॅहम थॉर्प इंग्लंडला मार्गदर्शन करणार आहेत.

सिडनी येथे नववर्षाच्या प्रारंभी होणारी कसोटी दरवर्षी ‘पिंक टेस्ट’ म्हणून ओळखली जाते आणि या लढतीद्वारे गोळा होणारा काही निधी माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राची पत्नी जेनच्या स्मृतीप्रीत्यर्थ कर्करोग झालेल्या रुग्णांना देण्यात येतो.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, टेन ३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *