महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी । मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) वाढता उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारकडून (Maharashtra Government) आता पावलं उचलण्यात येत आहेत. त्याच संदर्भात आज मंत्रालयात (Mantralaya) एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात कठोर निर्बंधल लावावेत की लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावावे या संदर्भात चर्चा झाली.
लॉकडाऊन लावण्याचा निर्णय होणार का? यासाठी सर्वांचेच लक्ष या बैठकीकडे लागलेले होते. पण या बैठकीत लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याची चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता सध्यातरी लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत नाहीये. पण कुठेतरी कठोर निर्बंध लावण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे.