राज्यात सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे – टोपे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ जानेवारी । राज्यात येथून पुढे कोरोना नियमांच्या अनुशंगाने नागरिकांसाठी सात दिवसांचे विलगीकरण सक्तीचे करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात राज्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढत जाणार असल्याने टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले. सध्या राज्याची पावणे दोन लाख कोरोना टेस्टिंग करण्याची क्षमता असल्याचे सांगतस ते म्हणाले की, अँटिजेन टेस्टवर मोठ्या प्रमाणावर भर देण्याची गरज लागणार असल्याचे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राज्यातील वाढता कोरोनाचा आकडा पाहता प्रशासन सतर्क झालं आहे. सध्या राज्यात दररोज 10 हजारांच्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने राज्य सरकारने महत्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉन आणि तिसऱ्या लाटेचं दुहेरी संकट पेलण्यासाठी सध्या मुंबई आणि पुण्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (Maharashtra Lockdown news) राज्यात संध्याकाळी 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी आहे. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी राज्य सरकार कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलवली. या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. (Maharashtra Mini Lockdown News)

राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्याच्या सरकार विचारात नाही(Maharashtra Lockdown Updates)

– लॉकडाऊनऐवजी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा सरकारचा विचार

– राज्यातील सरकारी कर्मचार्‍यांच्या उपस्थिती ७५ ते ५० टक्क्यांवर आणली जाण्याची शक्यता

– शक्य असेल त्या खासगी कार्यालयात वर्क फ्रॉम होम लागू करण्याची शक्यता

– दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा कमी केल्या जाण्याची शक्यता

– राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर आणखी निर्बंध

– आरोग्यसेवा सज्ज ठेवण्याची सरकारची तयारी

– मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *