महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ जानेवारी । भारतीय सराफा बाजारात आज 5 जानेवारी 2022 रोजी सोने दरात तेजी (Gold Price Today 5 January 2022) पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने दरात 154 रुपयांची वाढ झाली. तर चांदीचा दर 352 रुपयांनी वधारला.
आज दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोने दर 154 रुपये वाढीसह 46,969 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 46,815 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
आज चांदीचा दरही वधारला आहे. चांदीचा भाव 60 हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. दिल्ली सराफा बाजारात आज चांदीचा दर 352 रुपयांच्या तेजीसह 60,725 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. मागील सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 60,373 रुपये प्रति किग्रॅ इतका होता.
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.