आता निर्बंधांचं पालन केलं नाही तर… आरोग्यमंत्र्यांनी दिला थेट इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ जानेवारी । राज्यात 36 हजार कोरोना रुग्ण आढळून आले असून आपण आता हळू हळू तिसऱ्या लाटेकडे वाटचाल करत असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. आता लावलेल्या निर्बंधाचं पालन करणं गरजेचं असून जे निर्बंध पाळणार नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

निर्बंध पाळले नाहीत तर निर्बध आणखी कडक करावे लागतील असा इशारा देखील टोपे यांनी दिला आहे. मास्क नसेल तर दंड करा ,गर्दी टाळा असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्याना दिले जातील असंही टोपे म्हणाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाण्याची गरज नाही असंही टोपे म्हणाले. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असही टोपे म्हणाले.

देशात कोरोनाचा विस्फोट झाला असून 8 दिवसांत 1 लाख 17 हजार रुग्ण आढळून आले आहे यासाठी गर्दी टाळली पाहिजे तरच संसर्ग कमी होईल असंही त्यांनी सांगितलं.चित्रपट, नाट्यगृह, मंदिरं याबाबत लगेचच निर्बंध लावण्याचा प्रस्ताव नसून गरज पडली तर निर्बंध लावले जातील. मात्र या ठिकाणांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.अ नेक जिल्ह्यात शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या ठिकणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्यामूळे तो निर्णय घेण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले.

धारावीमध्ये 1 हजार रुपयात लस प्रमाणपत्र देणारी टोळी पकडली त्यांच्यावर सरकारकडून सक्त कारवाई केली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, माझ्यात आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं टोपे यांनी मान्य केलं असून चर्चा होत असतात मात्र अंतीम निर्णय हे मुख्यमंत्रीच घेतात असंही टोपे यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव जात असतात त्यांच्याकडे गेलेला प्रस्ताव मान्य झाल्यानंतरच अधिसूचना काढल्या जातात असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात लसीकरण वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून10 तारखेनंतर बुस्टर डोस घ्यावा या महामारीतुन नागरीकांना फकत लस वाचवेल अशी विनवणी देखील त्यांनी केली.लसीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असून पूर्वीपेक्षा कमी रुग्ण संख्या आहे.असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *