आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन ;मुंबई – जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोना विषाणू आता देशात पसरू लागला आहे. त्याला रोखण्यासाठी सर्व आवश्यक पाऊले उचलण्यात येत आहेत. अनेक कार्यालयात 25 टक्के कर्मचारी काम करत आहेत. खबरदारी म्हणून राज्यातील चार शहरातील दुकाने, व्यापार, उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर रिटर्न भरण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केली आहे.

आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित व उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत वाढवून द्यावी अशी विनंती आपण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केली आहे. याशिवाय 234 बी अंतर्गत व्याज वाचविण्यासाठी अग्रिम कर भरण्याची तसेच 30 एप्रिलची टीडीएस भरण्याची मुदतही वाढवून द्यावी अशी विनंती केली. फेब्रुवारी 2020ची जीएसटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 22 मार्च आहे, ती देखील वाढवावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *