काडेपेटीत मावणारी साडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । तेलंगणाच्या विणकराकडून निर्मिती , पश्मीना (उबदार आणि नरम वस्त्र) विषयी तुम्ही ऐकले असेल, ज्याला दुकानदार अंगठीमधून बाहेर काढून दाखवत असतो. भलेही पश्मीना अंगठीमधून बाहेर पडत असली तरीही एका काडेपेटीत पॅक होऊ शकते का? जरा विचार करा जर पश्मीना काडेपेटीत मावू शकत नसल्यास त्यात साडी कशी पॅक होऊ शकेल? परंतु तेलंगणाच्या एका हातमाग विणकराने हे शक्य करून दाखविले आहे.

या विणकराने तयार केलेली साडी काडेपेटीत सामावते. सोशल मीडियावर या साडीची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. तसेच लोक विणकराच्या कामाचे कौतुक देखील करत आहेत.

हे उत्तम कार्य करणाऱया विणकराचे नाव नाल्ला विजय असून तो राजन्ना सिरसिल्ला जिल्हय़ाचा रहिवासी आहे. विजयने मंगळवारी स्वतःची ही विशेष साडी मंत्री सबिता इंद्रारेड्डी यांना भेट म्हणून प्रदान केली आहे. अशाप्रकारची साडी तयार करण्यास सुमारे 6 दिवसांचा कालावधी लागत असल्याचे विजयने सांगितले आहे.

साडी तयार करण्यास यंत्राचा वापर केल्यास हे काम दोन दिवसांमध्येही पूर्ण होऊ शकते असे ते सांगतात. पारंपारिक हातमागावर विणल्यास या साडीची किंमत 12 हजार रुपये इतकी आहे. तर यंत्रावर तयार करण्यात आलेल्या साडीची किंमत 8 हजार रुपये आहे. सोशल मीडियावर विजयच्या या कौशल्याचे जोरदार कौतुक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *