RTE Admission Process : आता निवासी पुरावा म्हणून ‘ही’ कागदपत्रे उपयोगी नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । Changes in documents for proof : निवासी पुराव्याबाबत महत्वाची बातमी.शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठीच्या कागदपत्रांत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे याआधी काही कागदपत्रे पुरावा म्हणून वापरण्यात येत होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही कागदपत्रे उपयोगी ठरणार नाहीत. (RTE – Changes in documents for proof of residency in the admission process for 25 per cent reserved seats)

राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठी याआधी राष्ट्रीयीकृत बँक वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक (पासबुक) आणि गॅस बुक ग्राह्य धरले जात होते. आता यापुढे ग्राह्य धरले जाणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीयीकृत वगळता अन्य बँकांचे खातेपुस्तक, गॅस बुक ग्राह्य असणार नाही. 1 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली आहे.

गेल्यावर्षी, 2020-21 पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅस बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते पुस्तक, इतर स्थानिक बँकेचे खाते पुस्तक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीकृत केलेला भाडेकरार या पैकी कोणतेही एक कागदपत्र गाह्य धरले जात होते. आता यात बदल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *