राज्य सरकारचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । Student Scholarship :विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.(Extension till 31st January for availing benefits through DBT Portal – Dhananjay Munde)महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी घोषित केले आहे.

तसेच 2020-21 या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील सुमारे 4.70 लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरुन या सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नुतनीकरण करण्यास 12 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता त्यात पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *