IND vs SA ODI Series: भारत- दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकावर टाका नजर; पाहा कधी, कुठे रंगणार सामने?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनच्या मैदानात खेळण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झालाय. या पराभवासह भारतानं 2-1 च्या फरकानं मालिका देखील गमावलीय. केपटाऊनच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, भारतीय चाहत्यांची निराशा झालीय. यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळली जाणार. आता एकदिवसीय मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

येत्या 19 जानेवारी रोजी भारताच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलाय. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. दरम्यान, भारत- दक्षिण आफ्रिकेतील एकदिवसीय मालिकेच्या वेळापत्रकावर एकदा नजर टाकुयात. तसेच हे सामने कधी, कुठे खेळले जाणार आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

भारत- दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना- 19 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल)
दुसरा एकदिवसीय सामना- 21 जानेवारी (बोलंड पार्क, पार्ल)
तिसरा एकदिवसीय सामना- 23 जानेवारी (न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन)

भारतीय संघ-
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, जयंत यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *