रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा उत्साह पाहून थक्क व्हाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । तापमानाचा पारा जरा खाली गेला की हुडहुडी भरणारे आपण शुन्याच्या खारी पारा गेला की नेमकं काय करु याचा विचारही करु शकत नाही. पण, सैन्यदलाच्या सेवेत असणारे कित्येक जवान या परिस्थितीलाही आपलंसं करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर यासंदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथे जवान कडाक्याच्या थंडीत काय करताहेत हे पाहून सर्वजण थक्क होत आहेत.

थक्क होणाऱ्यांपेक्षाही जवानांची कर्तबगारी पाहून गर्व वाटणाऱ्यांची संख्या सध्या जास्त आहे.

चहूबाजुंना बर्फ असताना रंगला वॉलिबॉलचा सामना
आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे सैनिक स्वत:च्या करमणुकीसाठी धमाल शक्कल लढवताना दिसत आहेत.

काही निवांत क्षण मिळाल्यानंतर या जवानांनी एक वॉलीबॉल सामना आयोजित केला आणि ते या सामन्यात गुंग झाले.

चारही बाजूंनी असणारा बर्फाचा वेढा आणि त्यातच सुरु असणारा हा सामना पाहता, ही कोणती वेगळीच दुनिया असल्याची अनुभूती होत आहे.

आपण, इथे सर्वकाही असतानाही आपल्याकडे नसलेल्या गोष्टींसाठीच दु:ख करत असतो.पण, या मंडळींकडे पाहताना परिस्थिती कशीही असो, तिच्याशी एकरुप व्हावंच लागतं हीच शिकवणही मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *