तिसऱ्या कसोटीत भारताचा पराभव; दक्षिण अफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं ३ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

एडन मारक्रमनं २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसननं मोर्चा सांभाळला. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून तंबूत परतला. किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. मात्र किगन ८२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीनं विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद ४१ आणि टेम्बा बवुमा नाबाद ३२ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link