सोन्यासह चांदीच्या दरात तेजी : पहा आजचा भाव एका क्लिकवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ जानेवारी । सोन्याच्या भावात (Gold price) शुक्रवारी तेजी दिसून आली. राष्ट्रीय राजधानी दिल्ली मध्ये शुक्रवारी सोन्याच्या बाजार 93 रुपयांच्या वाढीसह बंद झाला. कालच्या (गुरुवार) तुलनेत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव (Gold rate today) 93 रुपयांनी वधारला. सोन्याचा भाव 46,912 रुपयांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील (Gold price in Delhi) तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. सोन्यासोबत चांदीच्या भावातही तेजीचं चित्र दिसून आलं. आज (शुक्रवारी) चांदीच्या भावात 59 रुपयांची वाढ दिसून आली. प्रति किलो चांदींचा भाव 61,005 रुपयांवर पोहोचला. काल (गुरुवारी) चांदीचा भाव 60,946 रुपये प्रति किलो नोंदविला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भाव 1,826 डॉलर प्रति औंस आणि चांदीच्या भाव 23.19 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिला.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ सल्लागार तपन पटेल यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव वाढीचा ट्रेंड आगामी काही दिवस कायम राहणार असल्याचे सूतोवाच केले आहे. देशातील प्रमुख शहरातील सोने-चांदीचे भावाविषयी माहिती देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स डॉट कॉम’ वेबसाईटवर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर खालीलप्रमाणे:

मुंबई

आर्थिक राजधानी मुंबईत सोन्याच्या भावात घसरण नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 120 रुपयांची घसरण झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 49,100 वरुन 48,980 वर पोहोचला.

मागील पाच दिवसांतील मुंबईतील सोन्याचे भाव-

• 14 जानेवारी: 48980/प्रति तोळे
• 13 जानेवारी: 46,940/प्रति तोळे
• 12 जानेवारी: 48590/ प्रति तोळे
• 11 जानेवारी :48,590/प्रति तोळे
• 10 जानेवारी :48,610/प्रति तोळे

पुणे

पुण्यात देखील सोन्याच्या भावात तीन अंकी वाढ नोंदविली गेली. 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा 190 रुपयांची वाढ झाली. प्रति तोळा सोन्याचा भाव 48,840 वरुन 49,030 वर पोहोचला.

मागील पाच दिवसांतील सोन्याचे भाव दृष्टीक्षेपात:

• जानेवारी 14 : 49,030/प्रति तोळे
• जानेवारी 13 : 48840/प्रति तोळे
• जानेवारी 12 : 48630/प्रति तोळे
• जानेवारी 11 :48,340 /प्रति तोळे
• जानेवारी 10 :48,350/प्रति तोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *