एन ९५ मास्क घेताय? असा ओळख बनावट मास्क

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १५ जानेवारी । देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव वाढत चालला असून यावेळी करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना तीन लेअर वाले एन ९५ मास्क वापरणे अधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर्स सांगत आहेत. परिणामी या मास्कच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे आणि एन ९५ सारखे दिसणारे अनेक बनावट मास्क बाजारात आले आहेत. त्यामुळे खरेदी करताना खरा आणि बनावट मास्क कसा ओळखावा याच्या काही हिंट्स दिल्या गेल्या आहेत.

सर्वसामान्य लोकांना सुद्धा एन ९५ मास्क खरा कि बनावट हे सहज ओळखता येणार आहे. एन ९५ मास्क चेहऱ्याला व्यवस्थित चिकटून बसतो आणि त्याच्या चारी बाजूना किनार आहे. पण बनावट मास्क सुद्धा असेच दिसतात. तेव्हा मास्क खरेदी पूर्वी चष्मा लावून हा मास्क घालावा आणि श्वास घ्यावा. जर काचेवर बाष्प किंवा वाफ धरली तर हवा बाहेर जाते हे समजते. हे मास्क बनावट आहेत.

एन ९५ चे चीनी आणि कोरियन अवतार सुद्धा बाजारातच नव्हे तर अगदी रस्त्यावर सुद्धा विकले जात आहेत. ऑनलाईन खरेदी करत असाल तर ब्रांडचे नाव सीडीसी इंडेक्सवर चेक करावे. त्याला एनआयओएसएच मान्यता आहे वा नाही हे पाहावे आणि मगच खरेदी करावी. एन ९५ मध्येही फिल्टर, वीदाऊट फिल्टर, सर्जिकल, डबल लेअर, फाईव्ह लेअर, थ्री लेअर असे अनेक प्रकार आहेत. त्यातील थ्री लेअर बाहेर पडताना वापरण्यास योग्य आहेत.

केएन ९५ हे पोल्युशन मास्क आहेत. ट्रिपल लेअर एन ९५ ची किंमत १२० ते २०० रुपये असून रस्त्यावर यापेक्षा कमी किमतीत सुद्धा हे मास्क विकले जातात. मात्र त्यांच्या आतील भागावर आरोग्य विषयक सूचना, कंपनीची माहिती, संपर्क क्रमांक नसेल तर हे मास्क बनावट आहेत असे म्हणता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *