IPL 2022 धोनीचा उत्तराधिकारी ठरला, ‘सीएसके’च्या ट्विटमधून मिळाले स्पष्ट संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ जानेवारी । इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2022) च्या यंदाच्या सीझनसाठी लवकरच मेगा ऑक्शन होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक संघाला चार खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली होती. चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने महेंद्रसिंग धोनीसह रविंद्र जाडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंना रिटेन केले. मात्र रिटेनवेळी सीएसकेने भविष्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले होते आणि आता ट्विटद्वारे त्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत.

सीएसकेने रविंद्र जाडेजा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू (16 कोटी) म्हणून तर धोनीला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू (12 कोटी) म्हणून रिटेन केले होते. त्याचवेळी धोनीचा कर्णधार म्हणून हा अखेरचा आयपीएल हंगाम असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. आता शक्यतांना बळ देणारे ट्विट सीएसकेने केले आहे. मेगा ऑक्शनपूर्वी केलेल्या या ट्विटमुळे सीएसकेने धोनीचा उत्तराधिकारी निवडल्याची चर्चा रंगू लागली आहे.

महेंद्रसिंग धोनी याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम केला आहे. टीम इंडियाचा मेण्टॉर म्हणूनही त्याने काम केले. आता आयपीएल 2022 मध्ये धोनी खेळणार असून याच दरम्यान सीएसकेचे कर्णदारपद तो रविंद्र जाडेजाकडे सोपवू सकतो. आयपीएलमध्ये धोनीने प्रत्येक सीझनमध्ये सीएसकेचे कर्णधारपद भूषवले आहे, मात्र आता तो 40 वर्षांचा झाला असल्याने नव्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवण्याची वेळ आली आहे.

आयपीएल 2022 दरम्यान धोनी जाडेजाला कर्णधारपद सोपवेल अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र तो सीएसकेची साथ सोडणार नसून मेण्टॉर म्हणून या संघाशी जोडलेला असेल असेही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तात म्हटले आहे.

रविंद्र जाडेजा अष्टपैलू खेळाडू आहे. 2011 पासून तो सीएसकेकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये 200 मॅच खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. गत काही वर्षांमध्ये त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यात चांगली कामगिरी केलीय. परंतु त्याच्याकडे कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे धोनी मेण्टॉर आणि जाडेजा कर्णधार अशी जोडी सीएसके जमवू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *