महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ जानेवारी । शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देखील आता यासाठी पुढाकार घेतलाय. कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता ड्रोन द्वारे ऊसावर औषध फवारणी करता येणार आहे. या ड्रोन औषध फवारणी चे प्रात्यक्षिक आज लिंगनूर इथं शाहू कारखान्याच्या चेअरमन सुहासिनीदेवी घाटगे आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या उपस्थित करण्यात आलं. ड्रोन औषध फवारणी मुळे शेतकऱ्यांच्या श्रम आणि पैशांची बचत होणार आहे.. शिवाय उसाची वाढ झाल्यानंतर मनुष्यबळा द्वारे औषध फवारणी करताना येणाऱ्या अडचणी चा सामना आता या शेतकऱ्यांना करावा लागणार नाहीये. शाहू कारखान्याचा कार्यक्षेत्र बरोबरच गेटकेन क्षेत्रातही हा उपक्रम राबवणार असल्याचं यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हटलंय.. कमी श्रम आणि पैशात उत्पादन वाढविणाऱ्या या उपक्रमाचं शेतकऱ्यांनी स्वागत केलय.