महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी सामाजिक जाणीवेमधून स्वतःचे व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे लक्षात घेऊन ट्रॅव्हल्स असोसिएशनने देखील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक बोलाविली. या बैठकीत ऍडव्हान्स बुकींग, ट्रॅव्हल्स कार्यालये आणि बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. संघटनेचे सचिव चंद्रकांत दानवले, उपाध्यक्ष सचिन सोनकुळे, अप्पा काळभोर आदी पदाधिकाऱ्यांसह सुमारे 40 ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड; कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी ऍडव्हान्स बुकींग आणि प्रवासी वाहतूक उद्या शनिवार (ता.21) पासून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ट्रॅव्हल्स असोसिएशन, पिंपरी-चिंचवडने घेतला आहे.
संघटनेचे अध्यक्ष बंडुशेठ काळभोर म्हणाले, ‘शहरामधून बाहेरगावी परतणाऱ्या नागरिकांची वाढती गर्दी कायम आहे. कोल्हापूर, नागपूर, अमरावती, जळगाव, धुळे आदी भागांतील खासगी प्रवासी गाड्या गर्दीने “फुल्ल’ झाल्या आहेत. शुक्रवारपर्यंतच्या बुकींगनुसार प्रवासी वाहतूक करण्यात आली. मात्र, शनिवार (ता.21) पासून 31 मार्चपर्यंत सर्व ट्रॅव्हल्स कार्यालये, ऍडव्हान्स बुकींग आणि बसगाड्या बंद ठेवण्याचा निर्णय आमच्या संघटनेच्या बैठकीत झाला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्या रिकाम्या येत असल्याने प्रवासी भाड्यात दुप्पटीने वाढ झाली होती. परराज्यापैकी गोव्यातील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. 2 दिवसांपूर्वी सूरत, भोपाळ आणि इंदूर गाड्या बंद झाल्या आहेत.”