महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;पिंपरी-चिंचवड; कोरोना व्हायरसशी फक्त हिंदुस्थानच नाही तर संपूर्ण जग झुंजतेय. या जीवघेण्या आजाराचा मुकाबला करण्यासाठीचा महत्वाचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. रविवारी दिवस उजाडण्यापासून मावळेपर्यंत घरी बसावं लागणार असल्याने दारूप्रेमींनी अख्खा दिवस ‘बसण्याची’ तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी लॉक डाउन मधील शहर आणि आसपासच्या परिसरातील वाईन शॉप बंद होण्याआधी अनेकांनी जेवढ्या जमतील तेवढ्या बाटल्या विकत घेऊन ठेवल्या.
शुक्रवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि मेडिकलची दुकाने वगळता इतर सगळी दुकाने बंद झाली होती. मात्र अनेक वाईन शॉप ही शटर अर्ध उघडं ठेवून किंवा ग्रिलच्या आडून दारूच्या बाटल्यांची विक्री करत होती.
कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करू नये यासाठी प्रशासन हरतर्हेचें प्रयत्न करत आहे. मात्र आपला स्टॉक जमा करून ठेवण्यासाठी दारुच्या दुकानात ज्या पद्धतीने गर्दी झाली होती ते पाहून चिंता व्यक्त केली जात आहे.