1 फेब्रुवारीपासून बदलणार या बँकांमधले नियम, वाचा सविस्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ जानेवारी । जर तुम्ही काही विशिष्ट बँकांचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण, 1 फेब्रुवारीपासून या बँकांचे काही नियम बदलण्यात येणार आहेत. यात चेक पेमेंट आणि आर्थिक व्यवहारांचा समावेश असेल.

या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा आहेत. या तिन्ही बँकांमधील काही नियमांमध्ये बदल होणार आहे. यात चेक क्लिअरन्स सिस्टिम, अधिक चार्ज अशा गोष्टींचा समावेश आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया – स्टेट बँकेच्या ग्राहकांना 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागेल. आयएमपीएस व्यवहारांसाठी येत्या 1 तारखेपासून एक नवीन स्लॅब जोडण्यात येणार आहे. त्यात 2 ते 5 लाख रुपयांची मर्यादा आहे. पुढील महिन्यापासून 2 ते 5 लाख रुपयांच्या आयएमपीएस व्यवहारांसाठी 20 रुपये अधिक जीएसटी इतका दर पडणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना 1 फेब्रुवारीपासून खात्यात पैसे नसल्यामुळे एखादा व्यवहार अडला किंवा परत आला तर त्याचे 250 रुपये दंड स्वरुपात भरावे लागतील. खात्यात पैसे नसताना जर एखाद्या कर्जाचा हप्ता किंवा गुंतवणुकीचा हप्ता अडला तर हा दंड कापून घेतला जाईल. आतापर्यंत हाच दर 100 रुपये इतका होता. तसंच जर डिमांड ड्राफ्ट रद्द करण्यासाठी देखील 100 ऐवजी 150 रुपये इतका दर लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *