BSNL चे सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅन्स; किंमत 199 पासून सुरू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ जानेवारी । BSNL Postpaid Plans : सरकारी दूरसंचार कंपनी BSNL खाजगी कंपन्यांना (Reliance Jio, Airtel, Vodafone Idea) केवळ प्रीपेड प्लॅन्समध्येच नव्हे तर पोस्टपेड प्लॅन (Postpaid Plans) साठी देखील चांगली स्पर्धा देत आहे. BSNL कडे अनेक पोस्टपेड प्लॅन आहेत, ज्यात इंडिविज्युअल आणि फॅमिली कनेक्शन देण्यात येतात. कंपनीच्या पोस्टपेड प्लॅनची ​​किंमत फक्त 199 रुपयांपासून सुरू होते. चला तर मग BSNL च्या पोस्टपेड प्लॅन बद्दल जाणून घेऊ या. 

हा BSNL चा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान आहे. या इंडिविज्युअल प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना अमर्यादित फ्री व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जातात. प्लॅनमध्ये तुम्हाला 25 GB फ्री डेटा मिळेल. 75 GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा देखील आहे.

हा यादीतील पुढील प्लॅन आहे, ज्याचे वेबसाइटवर “घर वापसी प्लॅन” असे वर्णन केले आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस आणि 70 जीबी मोफत डेटा दिला जातो. यामध्ये तुम्हाला 210 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा मिळते.

525 रुपयांच्या बीएसएनएल पोस्टपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित मोफत व्हॉइस कॉलिंग आणि 100 एसएमएस प्रतिदिन दिले जातात. यामध्ये तुम्हाला ८५ जीबी फ्री डेटा मिळेल. 255 GB पर्यंत डेटा रोलओव्हरची सुविधा देखील आहे. या प्लॅनमध्ये एक अतिरिक्त फॅमिली सिम देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये अमर्यादित मोफत कॉलिंग दिले जाते. तथापि, इतर सिममध्ये डेटा आणि एसएमएस उपलब्ध नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *