Indian Railways : दिल्लीला ट्रेननं जायचा विचार करताय? अनेक गाड्या उशिरानं; थंडी आणि धुक्याचा कहर सुरुच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २३ जानेवारी । उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडलेली आहे. गेल्या काही दिवासंपासून राजधानी दिल्ली आणि परिसरात पाऊस सुरु आहे. थंडी आणि पावसामुळं नवी दिल्लीतील तापमान कमी झालं आहे. याशिवाय उत्तर भारतात धुकं असल्यानं रेल्वे सेवा प्रभावित होतेय. धुक्याच्या कारणामुळं अनेक ट्रेन रद्द केल्या जात आहेत. काही ट्रेन उशिरानं धावतं आहेत. ही परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यामुळं प्रवाशांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. आजही काही ट्रेन उशिरा धावत आहेत. तर, काही रद्द करण्यात आल्या आहेत.सध्या उत्तर भारतात धुकं कमी होत नसल्यानं दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेन उशिरानं धावत आहेत.तुम्ही जर रेल्वेनं दिल्ली किंवा उत्तर भारतामध्ये जाण्याचं नियोजन केलं असेल तर ही बातमी महत्वाती आहे .

धुक्यामुळं रविवारी हैदरााद येथून हजरत निजामुद्दीनला जाणारी ट्रेन हैदराबाद निजामुद्दीन एक्स्प्रेस (12721) चार तास उशिरानं धावत आहे. तर, हावडा येथून नवी दिल्लीला जाणारी हावडा नवी दिल्ली एक्स्प्रेस (12303) ही गाडी सव्वा तास उशिरानं धावेल. तर. प्रतापगडहून दिल्लीला जाणारी प्रतापगड दिल्ली जंक्शन एक्स्प्रेस ट्रेन (14207) देखील उशिरानं धावत आहे.

जबलपूरहून निजामुद्दीनला जाणारी जबलपूर निजामुद्दीन एक्स्प्रेस पावणेचार तास उशिरा धावत आहे. याशिवाय आंबेकडकर नगर जम्मूवती एक्स्प्रेस देखील पावणे चार तास उशिरा धावत आहे. तर, मानिकपूर निजामुद्दीन एकस्प्रेस देखील 2 तास उशिरा धावतेय.

चेन्नईहून नवी दिल्लीला जाणाऱ्या चेन्नई नवी दिल्ली एक्स्प्रेस देखील उशिरानं धावत आहे. ही ट्रेन 2 तास उशिरा धावत आहे. हैदराबाद नवी दिल्ली एक्स्प्रेस देखील 2 तास उशिरा धावत आहे.

भोपाळहून निजामुद्दीनला जाणारी भोपाळ निजमुद्दीन एक्स्प्रेस देखील 1 तास उशिरा धावत आहे. बंगळुरु निजामुद्दीन एक्स्प्रेस तानतास उशिरा धावत आहे. तर, छिंदवाडा फिरोजपूर एक्स्प्रेस सव्वा चार तास उशिरा धावत आहे. मुंबई अमृतसर एक्स्प्रेस चार तास उशिरा धावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *