Pune पुणेकरांना दिलासा! पर्यटनस्थळांसह आजपासून काय काय सुरु? वाचा सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third Wave in Pune) पार्श्वभूमीवर पुण्यात अनेक नियम कडक करण्यात आले होते. कोरोनाची लाट आणि वाढता संसर्ग रोखण्यासाठी पर्यटन स्थळांसह कलम 144 देखील लागू करण्यात आलं होतं. अखेर आता पुण्यातील रुग्णवाढ हळूहळू नियंत्रणात येत असल्याचं दिसून आल्यामुळे अखेर जमावबंदीचं कलम 144 रद्द करण्यात आलं आहे. तसंच पुणे पुन्हा एकदा निर्बंधांतून शिथिल होत असून पर्यटन स्थळांसह अनेक गोष्टी आजपासून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार आहेत. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh) यांनी तशी माहितीही रविवारी संध्याकाळी जारी केली होती. दरम्यान मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे, सॅनिटायझेन याबाबतच्या नियमांचंही काटोकेरपणे पालन करणं बंधनकारक असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी म्हटलंय. गेल्या 15 दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन अखेर पुण्यासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.

काय काय सुरु?
पुणे जिल्ह्यातील सर्व जलतरण तलाव, खुली मैदाने, पर्यटनाच्या ठिकाणी असलेली सर्व दुकाने, हॉटेल्स आणि पर्यटन स्थळे आजपासून (24 जानेवारी) खुली करण्यात येत आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी सायंकाळी तसं जाहीर केले. तसंच या आदेशानुसार लागू असलेले कलम 144 रद्द करण्यात आलं आहे.

वाढत्या ओमिक्रॉन रुग्णांचा धोका लक्षात घेऊन पुण्यात निर्बंध जारी करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या 15 दिवसांची आकडेवारी जर पाहिली, तर त्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यंत कमी आहे. त्याामुळे अखेर पुण्यातील निर्बंध शिथिल केले जा आहेत. याबाबच सर्व विभाग प्रमुख, टास्क फोर्स आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकही पार पडली होती. त्यानुसार आजपासून अखेर सर्व दुकानांसह, हॉटेल, पर्यटनस्थळं, जलतरण तलाव आणि खुली मैदानं पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवारची पुण्यातील कोरोना रुग्णवाढ
– दिवसभरात 6299 नव्या रुग्णांची भर
– दिवसभरात 5375 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुणे शहरात कोरोनाबाधित 11 रुग्णांचा मृत्यू, याच पुण्याबाहेरील 06. एकूण 17 मृत्यू.
– 322 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 50
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 28
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 606379
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 46863
– एकूण मृत्यू -9192
– रविवारपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 550324
– रविवारी केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 17825

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *