IND vs SA ‘व्हाईटवॉश’ नंतर चे चिंतन ; कोच द्रविड भारतीय संघाचा कायापालट करणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ जानेवारी । टेस्ट सीरिजनंतर वन डे सीरिजमध्येही टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव सहन करावा लागला. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडियाला एकही विजय मिळवता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसारख्या नवख्या संघाने टीम इंडियाचा पराभव केल्याने क्रीडाप्रेमींना धक्का बसला असून कोच राहुल द्रविड यानेही ही सीरिज डोळे उघडणारी होती असे म्हटले आहे.

रविवारी केपटाऊनमध्ये झालेल्या अंतिम वन डे लढतीत टीम इंडियाला 4 रनने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह मालिकाही टीम इंडियाने 3-0 अशी गमावली. या पराभवानंतर टीम इंडियाचा मुख्य कोच राहुल द्रविड निराश दिसला. हा पराभव डोळे उघडणारा आहे. परंतु संघ संतुलीत करण्यासाठी काही खेळाडू उपलब्ध नव्हते, असेही तो म्हणाला. त्यामुळे आगामी काळात टीम इंडियाचा कायापालट होताना दिसेल.

माझा या संघासोबत पहिलाच दौरा होता आणि टीमनेही जास्त वन डे खेळलेल्या नाहीत. हिंदुस्थानने 2019 मध्ये झालेल्या वन डे वर्ल्डकपनंतर खूप कमी वन डे खेळल्या आहेत. टीम इंडियाने आपला अखेरचा वन डे सामना मार्च 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता, असे म्हणत राहुल द्रविडने संघाची पाठराखम केली. मात्र 2023 मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला पांढऱ्या चेंडूने भरपूर क्रिकेट खेळायचे असून संघाच्या कामगिरीत सुधारणा दिसेल, असेही तो म्हणाला.

तिन्ही लढतीत टीम इंडियाची मधळी फळी चालली नाही. तसेच 20 ते 40 षटकांच्या मध्ये विकेटही गमावल्या. याबाबत बोलताना राहुल द्रविड म्हणाला की, मधल्या षटकांमध्ये आम्ही चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्हाला मिडल ऑर्डर मजबूत करावी लागेल. काही खेळाडू उपलब्ध नसल्याने संघाचे संतुलन बिघडल्याचे द्रविडने मान्य केले.

गायकवाडला संधी नाही?

दरम्यान, ऋतुराज गायकवाड याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. तिन्ही लढतीत तो बेंचवर बसून होता. गायकवाड सध्या फॉर्मात असून त्याने आयपीएल 2021 आणि त्यानंतर झालेल्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा वसूल केल्या आहेत. तरीही त्याला संधी का मिळाली नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *