महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्याच्या बायका आमच्या पक्षात येणार; करुणा मुंडेंचा नवा गौप्यस्फोट

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ जानेवारी । राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार होत्या. मात्र कोरोनामुळे पक्षाची स्थापना लांबणीवर पडल्याचे दिसत आहे. आज करुणा यांनी अहमदनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेऊन पत्रकार परिषद घेतली. त्यात करुणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांच्या बायकाही माझ्याप्रमाणेच त्रस्त आहेत.

त्यादेखील आपल्यासोबत येणार आहे. असा गौप्यस्फोट करुणा यांनी केला आहे. पत्रकारांनी त्यांना त्या मंत्र्याचे नावे विचारले असता, त्यात करुणा यांनी सध्या तरी नावे सांगण्यास नकार दिला आहे. माज्ञ त्यांनी पक्षाचे नाव स्पष्ट केले आहे. एक शिवसेना आणि एक राष्ट्रवादीचा असे सुचक इशारा करुणा यांनी दिला आहे.

करुणा मुंडे यांना ‘शिवशक्ती सेना’ या नव्या पक्षाची घोषणा केली होती. अहमदनगरमध्ये 30 जानेवारी 2022 ला कार्यकर्ता मेळावा घेऊन पक्षाची स्थापना करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने पक्षाची स्थापना लांबणीवर पडली आहे. आज करुणा मुंडे नगर दौऱ्यावर होत्या. त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

दोन आमदारांच्या पत्नी आपल्या संपर्कात

माझ्यावर जी परिस्थिती आली तशीच परिस्थिती अनेक मंत्र्यांच्या कुटुंबातही आलेली आहे. राज्यातील विद्यमान दोन मंत्र्यांच्या पत्नी आपल्या संपर्कात आहेत. त्याही आमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांची नावे आताच जाहीर केली जाणार नाहीत. नगरमध्ये पक्षाची स्थापना केली जाईल, तेव्हा सगळे स्पष्ट होईल. असे करुणा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

राजकारणात येऊ नये म्हणून धनंजय मुंडे दबाव टाकत आहे

मी राजकारणात येऊ नये म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण एकदा राजकारणात आल्यावर मागे वळायचे नसते, असे मी ठरवले आहे. मी एकदम साधी राहणारी आहे. मंत्र्यांच्या बायका गाडीतून फिरतात. 25 हजारांच्या साड्या परिधान करतात. धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नीच्या कपाटात तीन कोटींच्या साड्या आहेत. पण माझ्याकडे कपाटात पाच लाखांच्याही साड्या नाहीत. असे करुणा म्हणाल्या.

राज्यपालांची भेट घेणार

राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आपण लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे करुणा यांनी सांगितले. राज्यातील अनेक कामे प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मंत्र्यांची दालने आणि आमदार निवासावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे ठरविले आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही राज्यभर दौरा सुरू केलेला आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असता माझे पती मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी माझी सभा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र न डगमगता माझे कार्य पुढे सुरू ठेवणार आहे. आमच्या पक्षात अनेक संघटना तसेच इतर पक्षाचे लोकही येणार आहेत. त्यासाठी आमची त्यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यावर नगरमध्येच नव्या पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली जाणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *