२७ जानेवारी रोजी पुण्यातील ‘या’ भागांतील पाणीपुरवठा बंद

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ जानेवारी । वारजे जलकेंद्र, खडकवासला उपसा (रॉ वॉटर) केंद्र तसेच रायझिंग मेन लाइनवर स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी काम करावयाचे असल्यामुळे, येत्या २७ जानेवारी (गुरुवार) कोथरूड, डेक्कन, बाणेर-बालेवाडी तसेच विमाननगर व लोहगाव परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर २८ जानेवारी (शुक्रवार) रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

या कामामुळे २७ जानेवारी रोजी वारजे जलकेंद्र येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे. यामुळे वारजे व पाषाण जलकेंद्र तसेच नवीन होळकर जलकेंद्र यांना होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भूगाव परिसर, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे हाय-वे परिसर, रामनगर, कर्वे रस्ता , एरंडवणा, कोथरूड, डेक्कन जिमखाना परिसर, जयभवानी नगर, सुतारदरा, डहाणूकर कॉलनी, परमहंसनगर, गांधीभवन, महात्मा सोसायटी, हिंगणे होम कॉलनी, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, कॅनॉल रस्ता

नवीन होळकर जलकेंद्राकडील परिसर: कळस, धानोरी, विमाननगर, लोहगाव, पंचायत, शिवाजीनगर, भोसलेनगर, घोले रस्ता, सेनापती बापट रस्ता, बोपोडी, खडकी, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाइन, मुळा रोड, संगमवाडी, पाटील इस्टेट, भांडारकर रस्ता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *