महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ जानेवारी । मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढत आहे. परभणी जिल्ह्यात सोमवारी सकाळी काही प्रमाणात धुक्यासह झोंबणारे थंडगार वारे सुटल्याने चांगलीच हुडहुडी भरली होती. परभणीचे किमान तापमान ११ अंश सेल्सियसवर गेल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली आहे.
मागील काही दिवसांत ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ होती. मात्र आता परत घट होत आहे. २३ जानेवारी रोजी परभणीचे तापमान १२.५ अंश सेल्सियस होते. त्यात घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवाय मराठवाड्यात सर्वत्र पहाटे आणि रात्रीच्या सुमारास थंडगार वारे वाहत आहेत. थंडीचा जोर वाढत असल्याने शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात असे आहे तापमान
शहर कमाल किमान
औरंगाबाद २३.४ १०.२
हिंगोली २६.१ १५.२
परभणी २४.१ ११.०
शहर कमाल किमान
नांदेड २६.२ १४.६
बीड २९.० १३.०
उस्मानाबाद २४.१ १४.७
किमान तापमानात २ अंशांनी घट होण्याची शक्यता
परभणी : थंडीचा जोर वाढल्यानंतर शहरात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या.
परभणीत किमान तापमान ११ अंश सेल्सियसवर, धुकेही पसरले
वातावरण बदलाचा पिकांना फटका बसतोय का?
यंदाच्या हिवाळ्यात सातत्याने वातावरणात बदल होत आहे. सुरुवातीस काही काळ थंडी होती. त्यानंतर परत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊसही झाला. याचा रब्बी हंगामातील सर्व पिकांना फटका बसत आहे.