महाराष्ट्र गारठला : ‘या’ जिल्ह्यांमध्ये पारा घसरला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । राज्यातला तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पहाटेचं तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली गेलंय. वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे तापमानात घट झाली आहे. या पश्चिमी वाऱ्यांमुळे दरवर्षी उत्तर भारतात थंडीची लाट येते. मात्र, यंदा उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातातही त्याचा प्रभाव जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यभरात अचानक पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसभात राज्यभरात किमान तापमान कमी होऊन थंडी (Maharashtra Weather Forecast) वाढण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं (IMD) अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा सर्वाधिक प्रभाव जाणवण्याची शक्यताही वर्तवली आहे.

आज म्हणजेच 26 जानेवारीला मध्य महाराष्ट्र, खान्देश आणि मराठवाड्यात तापमान आणखी घसरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली असणार आहे. २६ जानेवारीला राज्यात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात शीत दिवस व अतीशीत लहरीची शक्यता आहे. मुंबई दिवसा कमाल तापमानात घट झाली असून, हे कमाल तापमान २३ ते २६ अंश नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *