शौर्य पुरस्कार 2022:महाराष्ट्राला 51 पोलिस पदके; औरंगाबादच्या माळाळेंसह मराठवाड्यातील चार अधिकारी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । पोलिस पदकांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलिस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, ७ ‘पोलिस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी ४० ‘पोलिस पदके’ जाहीर झाली आहेत. यात औरंगाबादच्या सातारा पोलिस स्टेशनचे सुरेंद्र गजेंद्र माळाळे यांचाही समावेश असून मराठवाड्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलिस पदक’ जाहीर करते. या वर्षी एकूण ९३९ ‘पोलिस पदके’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदके’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदके मिळाली आहेत.

देशातील ८८ पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे कळवण्यात आले आहे. करगावकर, खाडे, गुंडगे व बेग मिर्झा यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’

विनय महादेवराव करगावकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक (पीसीआर), जुने कस्टम हाऊस, फोर्ट, मुंबई महाराष्ट्र
प्रल्हाद निवृत्ती खाडे, कमांडंट एसआरपीएफ, गट ६, धुळे
चंद्रकांत रामभाऊ गुंडगे, पोलिस निरीक्षक पीटीसी नानवीज, दौंड, पुणे
अन्वर बेग इब्राहिम बेग मिर्झा, पोलिस उपनिरीक्षक एसपी, नांदेडराज्यातील एकूण सात पोलिसांना ‘पोलिस शौर्य पदक’
गोपाळ मणिराम उसेंडी, सहायक पोलिस उपनिरीक्षक
महेंद्र गानू कुलेटी, नाईक पोलिस हवालदारसंजय गणपती बकमवार, पोलिस हवालदार
भरत चिंतामण नागरे, पोलिस उपनिरीक्षक
दिवाकर केसरी नारोटे, नाईक पोलिस हवालदार
नीलेश्वर देवाजी पड, नाईक पोलिस हवालदार
संतोष विजय पोटवी, पोलिस हवालदार
राज्यातील एकूण ४० पोलिसांना ‘पोलिस पदक’
राजेश प्रधान, विशेष पोलिस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर, मुंबई
चंद्रकांत महादेव जाधव, सहायक पोलिस आयुक्त सीपी मीरा भाईंदर, वसई-विरार
सीताराम लक्ष्मण जाधव, पोलिस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे
भारत केशवराव हुंबे, पोलिस निरीक्षक, एसीबी परभणी
गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलिस अधीक्षक कार्यालय, लातूर
अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलिस निरीक्षक, सीपी नवी मुंबई
जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलिस निरीक्षक सीपी मुंबई
विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलिस निरीक्षक एसपीसीआयडी नागपूर
जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सीपी, नवी मुंबई
सुरेंद्र गजेंद्र माळाळे, पोलिस निरीक्षक सातारा पोलिस स्टेशन, औरंगाबाद शहर
प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट ४, नागपूर
मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलिस निरीक्षक, मुख्य गुप्तचर अधिकारी, एसआयडी, मुंबई
शशिकांत दादू जगदाळे, पोलिस निरीक्षक सीपी, मुंबई शहर
रघुनाथ रामचंद्र निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर
संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर
राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलिस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर
प्रकाश भिला चौधरी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलिस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर
राजेश रावणराव जाधव, पोलिस उपनिरीक्षक, एसपी परभणी
शिवाजी विठ्ठल देसाई, पोलिस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर
राजाराम धर्मा भोई, पोलिस उपनिरीक्षक, एसपी जळगाव
देवेंद्र परशराम बागी, पोलिस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सातारा
बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलिस उपनिरीक्षक, एचएसपीएसपी, कोल्हापूर
पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
विजय उत्तम भोग, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर
पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई
राजेंद्र कृष्ण चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर
अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी भंडारा
संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,
रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ
अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलिस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर
सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर
बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली
काशीनाथ मारुती उभे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एटीएस पुणे
अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर
आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली
मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर
सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर
लहू मनोहर राऊत, सहायक पोलिस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *