पीएम किसान पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत नोंदणी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ जानेवारी । पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची इ – केवायसी ता. ३१ मार्च अखेर पर्यंत पूर्ण करण्याबाबत शासनाच्या सूचना प्राप्त आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा पुढील एप्रिल – जुलै या कालावधीचा लाभ मिळण्यासाठी इ – केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे.

त्या अनुषंगाने इ – केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (pm kisan) https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये पीएम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थींना स्वतः इ – केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) येथे प्रती लाभार्थी १५ रुपये दराने इ – केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *