रेडमीचा 5G या फोन मिळता येत भन्नाट फीचर्स ; भारतात झाला लॉंच

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । Xiaomi ने भारतात आपला स्मार्टफोन Redmi Note 11T 5G भारतात लॉन्च केला आहे. हा नवीन Redmi फोन रेग्युलर Redmi Note 11 5G रीब्रॅंडेड व्हर्जन आहे जे Xiaomi ने गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च केले होते. Redmi Note 11T 5G फोन 90Hz डिस्प्लेसह आणि ड्युअल रियर कॅमेऱ्यांसह लॉंच करण्यात आला आहे. ग्राहकांना या फोनमध्ये होल-पंच डिस्प्ले डिझाइन मिळणार आहे आणि त्यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील असेल. रेडमीच्या या फोनची थेट स्पर्धाही Realme 8s 5G, iQoo Z3 आणि Lava Agni 5G शी होणार आहे.

भारतातील किंमत आणि ऑफर

भारतात Redmi Note 11T 5G च्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्याच वेळी, स्मार्टफोन 6GB + 128GB आणि 8GB + 128GB व्हेरियंटमध्ये देखील येतो, ज्याची किंमत अनुक्रमे 17,999 आणि 19,999 रुपये आहे. Redmi Note 11T 5G एक्वामेरीन ब्लू, मॅट ब्लॅक आणि स्टारडस्ट व्हाइट रंगांमध्ये येतो. तसेच हा फोन 7 डिसेंबरपासून Amazon, Mi.com, Mi Home आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. Redmi Note 11T 5G वर लॉन्च ऑफर अंतर्गत 1000 ची सूट दिली जात आहे. ICICI बँक क्रेडिट कार्ड किंवा EMI वापरून 1000 इंस्टंट सूट देखील मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *