भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी ; न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथेही निराशाच पाहायला मिळाली. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज सुप्रीम कोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर लावला आहे. तसेच राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील आमदार नितेश राणे यांचे एक कृत्य पाहायला मिळाले होते. विधान सभेच्या पायऱ्यावर बसुन भाजप नेत्यांनी मंत्री आदित्य ठाकरे विधान भवनात जात असताना म्याव म्यावचा नारा दिला होता.

आज होणार सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज या प्रकरणात सुनावणी होणार असून, सुप्रीम आज काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आतापर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात आणि मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *