पुण्यात करोनाचा कहर ? महाराष्ट्राच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर दुप्पट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । मुंबई, ठाणे, वर्धा, अकोला आणि नाशिकच्या तुलनेत महाराष्ट्रातील सर्वात जोखीम असलेल्या शहरांमध्ये म्हणजेच पुण्यात कोविडचा (COVID) साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) ४९.९ टक्के असल्याचं समोर आलं आहे. हा दर गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी २४ टक्क्यांच्या दुप्पट आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचं पालन करून आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, १७ ते २४ जानेवारी दरम्यान झालेल्या RT-PCR चाचणीद्वारे एकूण ८४,९०२ लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. इतकंच नाहीतर रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) तसेच RT-PCR साठी एकूण २.२२ लाख नमुने तपासण्यात आले. ज्यामध्ये ९७,८३८ लोक पॉझिटिव्ह आढळले.

अशात एकूण आकडेवारी पाहता पुणे शहरातील करोनाचे प्रमाण चिंताजनक आहे. हे थांबवण्यासाठी नागरिकांनी नियमांचं पालन करत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला सर्दी-तापाची साधी लक्षणं असतील तर घरीच उपचार घ्या, अशाही सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनमुळेच हे घडत असून, येत्या दहा दिवसांपर्यंत हीच परिस्थिती राहू शकते, असे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या काळात लोकांनी खूप काळजी घ्यावी आणि घरातच राहावे. १०-१५ दिवसांनी केसेस कमी होण्यास सुरुवात होईल, अशी आमची अपेक्षा आहे असं पीएमसीचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *