मध्य रेल्वेचा 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान 72 तासांचा मेगाब्लॉक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ जानेवारी । मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान तब्बल 72 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा या पाचव्या, सहाव्या मार्गाला मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी गती दिली जात आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने पाचवी, सहावी मार्गिकी 6 फेब्रुवारीपासून खुली होणार असल्याची माहिती दिली आहे. पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यानंतर मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत होणार आहे.

ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत या मार्गिकेच्या विविध कामांसाठी मोठमोठे मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार डिसेंबर 2021 मध्ये 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. तर 24 तासांचा जानेवारी 2022 मध्ये आणि 36 तासांचाही मेगाब्लॉक घेण्यात आला होता. 14 तासांचा मेगाब्लॉक 23 जानेवारीला असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हा मेगाब्लॉक मध्यरात्री 1.20 ते दुसऱ्या दिवशी दुपारी 3.20 पर्यंत घेण्यात येणार आहे. त्यावेळी साधारण 300 हून अधिक लोकल फेऱ्या रद्द असतील. या ब्लॉकनंतर सर्वात मोठा ब्लॉक 72 तासांचा असणार आहे. हा ब्लॉक 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा घेण्यात येणार आहे. त्यावेळी लोकल फेऱ्या रद्द करतानाच मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होईल.

मध्य रेल्वे वेळापत्रकामध्ये 100 पेक्षा जास्त लोकल पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर वाढवू शकतात. तसेच मध्य रेल्वेच्या प्रवासी क्षमतेमध्ये अडीच ते तीन लाख प्रवासी वाढतील. त्यामुळेच हे काम महत्त्वपूर्ण असून येणाऱ्या काळात 72 तासांचा सर्वात मोठा आणि शेवटचा जम्बो मेगाब्लॉक घेऊन फेब्रुवारीमध्ये हे काम पूर्ण होणार आहे.

कल्याण ते दिवा आणि ठाणे ते कुर्ल्यापर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका आतापर्यंत झाली आहे. गेली दहा वर्षे ठाणे ते दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेचे काम रखडले होते. मार्च 2019 अंतिम मुदत असतानाही त्यात अनेक वेळा बदल झाला होता. त्यानंतर जून 2021 ही अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. पण कोरोना आणि परिणामी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कमी मनुष्यबळ आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे या कामात पुन्हा अडथळा आला. त्यामुळे आता मार्च 2022 च्या आधी ही मार्गिका पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी असा 72 तासांचा मेगाब्लॉक ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होताच 6 फेब्रुवारीपासून ही मार्गिका खुली होईल. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल आणि लोकलचे वेळापत्रकही सुधारण्यास मदत मिळेल, असे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *