महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । एअर इंडियाच्या ‘पुनर्जन्मा’सोबतच विमान प्रवाशांचेही ‘महाराजा’ युग सुरू झाले आहे. जेव्हा तुम्ही एअर इंडियाच्या एखाद्या विमानातून प्रवास कराला, तेव्हा याची प्रचिती येईल. शुक्रवारपासून एअर इंडियाच्या विमानांत ८४ वर्षीय रतन टाटांच्या आवाजात एक ऑडिअो मेसेजसोबत तुमचे स्वागत केले जाईल. नंतर ‘उन्नत भोजन सेवा’ अंतर्गत मोफत जेवण दिले जाईल. ही सेवा टप्प्याटप्प्याने सर्व विमानांत सुरू होईल. गुरुवारी मुंबई-दिल्ली, मुंबई-बंगळुरूसह चार विमानांत तिचा शुभारंभ झाला.
देशाच्या विमान उद्योगात पुढील सहा महिन्यांत अनेक बदल पाहावयास मिळतील.काही नव्या आणि काही जुन्या कंपन्या नव्या रूपात मैदानात उतरत आहेत. भारतातील विमान प्रवास उद्याेग सध्या १.२ लाख कोटी रुपयांचा आहे. चीन व अमेरिकेनंतर विमान प्रवास क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या अंदाजानुसार २०३० पर्यंत भारत जगात पहिल्या क्रमांकावर जाईल.
विमान प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. पुढील ४-६ महिन्यांत देशाच्या विमान उद्योगात नव्या कंपन्यांच्या एंट्रीमुळे दरयुद्ध सुरू होणे अपरिहार्य आहे. यामुळे प्रवाशांना स्वस्त तिकीट आणि जास्त मार्ग उपलब्धतेच्या रूपात फायदा होईल. त्याचा हा वृत्तांत…
जेट एअरवेज 2; स्वस्तात प्रवास, अधिक मार्ग देणार
जालान-कालरॉक कन्सोर्टियम १३७५ कोटी रुपयांत नवा जीव ओतेल. ५ वर्षांत १०० विमानांचे लक्ष्य. कंपनी १००० कर्मचारी भरती करणार. यामुळे प्रवाशांसाठी जास्त पर्याय उपलब्ध होतील. मार्च २०२२ पर्यंत सुरुवात होईल.
११७ विमानांचा विशाल ताफा आहे. ४४८० राष्ट्रीय, २७३८ आंतरराष्ट्रीय लँडिंग-पार्किंग स्लॉट. बाजारात हिस्सेदारीत इंडिगोनंतर दुसरे स्थानावर आहे. खाण्यापिण्यासह सुविधांवर अधिक लक्ष. २७-३५% मार्केट शेअर मिळवू शकते.
अकासा; कमी भाड्यात सर्व आवश्यक सुविधा
गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी या कंपनीत २६० कोटी रु.ची गुंतवणूक केली आहे. पुढील ४ वर्षात ताफ्यात ७० विमाने येण्याची आशा आहे. भाडे कमी होईल. प्रवाशांना सर्व आवश्यक सुविधा मिळतील. जून २०२२ पर्यंत विमानसेवा सुरू हाेईल.
‘टाटा स्काय’ बॅनरखाली येऊ शकतात समूहाच्या तिन्ही विमान कंपन्या?
टाटाने आपली डीटीएच सेवा टाटा स्कायचे नाव बदलून ‘टाटा प्ले’ केले आहे. त्यात नेटफ्लिक्सचाही अॅक्सेस असेल. विमान कंपनी एअर इंडिया पूर्णपणे टाटा समूहाची झाली असताना ही घोषणा झाली आहे. यामुळे टाटा समूह आता आपल्या तिन्ही विमान कंपन्यांचे (एअर इंडिया, विस्तारा, एअर आशिया) ‘टाटा स्काय’ नावाने संचालन करू शकतो, अशी चर्चा सुरू आहे.
‘टाटा स्काय’ आता ‘टाटा प्ले’
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन मोदींना भेटले. जेआरडींनी टाटा एअरलाइन्स १९३२ मध्ये सुरू केली. १९४८ मध्ये सरकारने ४९% शेअर खरेदी करून ‘एअर इंडिया’ नाव ठेवले.