कोरोनाचा खात्मा करण्यासाठी नेझल वॅक्सिनही सज्ज; सरकारने घेतला मोठा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२९ जानेवारी । कोरोना महामारीविरूद्धच्या लढाईत सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. भारत बायोटेकच्या नेझल लसीच्या चाचणीला सरकारने मान्यता दिलीये. नेजल लस ही नाकातून दिली जाणारी लस आहे. या लसीची चाचणी देशभरात घेतली जाणार आहे. चाचणीमध्ये ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास, ती बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकच्या इंट्रानेसल लसीला मान्यता दिलीये आहे. त्याचे नाव BBV154 आहे. हे भारत बायोटेक आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन यांनी मिळून बनवली आहे. त्याच्या फेज-1 आणि फेज-2 चाचण्या झाल्या असून आता फेज-3 चाचण्यांना मान्यता देण्यात आली आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, भारत बायोटेकने दावा केला की, 2022 मध्ये नेझल लसीचे 100 कोटी डोस तयार करण्याचं लक्ष्य आहे.

भारतात आतापर्यंत 8 लसींच्या वापरास मान्यता देण्यात आलीये आहे. या सर्व इंट्रामस्क्युलर लसी आहेत. या इंजेक्शनद्वारे दिल्या जातात. पण भारत बायोटेकची ही लस नाकावाटे घ्यावी लागणार आहे. कोरोनासह बहुतेक व्हायरस म्युकोसाद्वारे शरीरात प्रवेश करतो. म्युकोसा त्वचा नाक, फुफ्फुस आणि पचनमार्गात आढळणारा एक चिकट पदार्थ आहे. नेझल लस थेट म्युकोसामध्ये एक इम्युन रिस्पॉन्स निर्माण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *