महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; मुंबई ;महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून रूग्णांची संख्या ८९ वर गेली आहे. कोरोना प्रार्दुभावच्या खबरदारीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोशल डिस्टसिंग ठेवण्यासाठी कळकळीचे आवाहन त्यांनी केले. राज्यात कोरोना कम्युनिटी स्प्रेड झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. संसर्ग टाळण्यासाठी काही सीमा लॉक करण्याचा विचार सुरु असल्यचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. लोकांनी नियम पाळले नाही, तर कारवाई करावीच लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. येत्या २७ तारखेपासून राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात लॅब सुरु होईल, अशी माहितीही त्यांनी केली.
ज्या राज्यातून अधिक धोका वाटतो. त्या राज्याच्या सीमा बंद करण्याचा लवकरच निर्णय
आरोग्यमंत्री काय म्हणाले ?
# मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये
# जनतेने जमावबंदी आदेशाचे तंतोतंत पालन करावे
# अन्यथा दुर्दैवाने कारवाई करावी लागेल
# संसर्ग रोखण्यासाठी धोकादायक काही जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचा विचार
# 27 तारखेपासून प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लॅब सुरु होणार