महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; मुंबई ; मुंबई: ‘करोना’च्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी लागू केल्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. ‘करोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वत:च्या व दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
‘करोना’चं संकट दिवसेंदिवस वाढत असून बाधित रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसंच, सर्वसामान्यांसाठी सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. मात्र, जनता कर्फ्यूची उठताच मुंबईतील अनेक लोक आपापल्या खासगी वाहनानं गावाच्या दिशेनं निघाले आहेत. त्यामुळं वाहतूक कोंडी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी एक ट्विट केलं आहे.
‘कोरोनाविरुद्धचा लढा गंभीरपणे घ्या. स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या आरोग्याशी खेळू नका. १४४ कलम लावलं आहे. त्यामुळं केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. रस्त्यांवर वाहनं आणून गर्दी करून कायदा मोडू नका,’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1241952737622773761?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1241952737622773761&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.indiatimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-news%2Fcoronavirus-cm-uddhav-thackeray-appeals-citizens-to-respect-law%2Farticleshow%2F74768739.cms