महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । भारताविरूद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी (India vs West Indies) वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. कायरन पोलार्ड (Kieron Pollard) या टीमचा कॅप्टन असेल. तर निकोलस पूरनकडं (Nichollas Pooran) व्हाईस कॅप्टनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्लंड विरूद्ध सध्या सुरू असलेल्या 16 सदस्यीय टीमवरच निवड समितीनं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
या टीममधून ख्रिस गेल, इव्हान लुईस आणि हेटमायर या आयपीएल स्टार्सचा समावेश नाही. इंग्लंड विरूद्ध सुरू असलेल्या मालिकेत खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच खेळाडूंना भारताविरूद्धही संधी देण्यात आली आहे, असे वेस्ट इंडिज टीमच्या निवड समितीचे अध्यक्ष डेसमेंड हेन्स यांनी सांगितले.
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज T20 मालिकेचे वेळापत्रक
16 फेब्रुवारी – पहिली T20, कोलकाता
18 फेब्रुवारी – दुसरी T20, कोलकाता
20 फेब्रुवारी – तिसरी T20, कोलकाता
T20 मालिकेसाठी वेस्ट इंडिजची टीम : कायरन पोलार्ड (कॅप्टन), निकोलस पूरन, फॅबियन एलन, डॅरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉट्रेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, ब्रेडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, काइल मायर्स, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.
वेस्ट इंडिजची वन-डे टीम : कायरन पोलार्ड (कर्णधार), केमार रोच, एनक्रुमाह बोनर, ब्रँडन किंग, फॅबियन एलेन, डॅरेन ब्राव्हो, शामराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अलझारी जोसेफ, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि हेडन वॉल्श ज्युनिअर
भारताची वन-डे टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान
भारताची टी20 टीम : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल