पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले, आयोगाकडून कार्यक्रम जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० जानेवारी । आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा येत्या १ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. रात्री उशिरा १ वाजता राज्य निवडणूक आयोगाकडून यासंबंधीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामुळे पालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महापालिका १ फेब्रुवारीला प्रारूप प्रभाग आराखडा जाहीर करेल. त्यानंतर त्यावर १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. प्राप्त हरकती १६ फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत.

२६ फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी २ मार्च २०२२ रोजी निवडणूक आयोगाला पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.

पुणे महापालिका निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचनेचा कागदोपत्री प्रस्ताव २० जानेवारी २०२२ रोजी आयोगाला सादर केला होता. दरम्यान यावेळेस प्रभाग रचना आरक्षण सोडत जाहीर होताना आरक्षण सोडत जाहीर होणार नाही. त्यासंबंधीचा कार्यक्रम आयोगाकडून नंतर जाहीर केला जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेसाठी 173 जागांसाठी जाहीर केलेल्या 58 प्रभागांपैकी 57 प्रभाग हे त्रिसदसीय राहणार असून त्यामध्ये सर्वांत कमी लोक संख्या असलेला प्रभाग 55 हजारांचा असेल तर सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रभाग हा 66 हजारचा असेल. तर एकमेव द्विसदस्यीय प्रभाग हा प्रभाग क्र. 13 हा राहणार असून त्याची मतदार संख्या 37 हजार 589 आहे.

58 प्रभागांमधील 173 जागांपैकी 23 जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव असतील. त्यापैकी 12 जागा महिला व 11 जागा पुरुषांसाठी राखीव राहतील. तर अनुसूचित जमाती साठी 2 जागा राखीव असतील. पुरुष आणि महिला उमेदवारीसाठी प्रत्येकी एक जागा राहील.
173 जागांपैकी 50 टक्के आरक्षणानुसार 87 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत.

प्रभाग 1 आणि 14 मध्ये प्रत्येकी एक जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव राहणार आहे.

अनुसूचित जमाती एकूण लोकसंख्या : 4 लाख80 हजार 17

अनुसुचित जातीसाठी राखीव असलेले

प्रभाग क्र. : 1, 3, 4, 7, 8, 9, 10, 12, 19, 20, 21, 22, 26, 27, 35, 37, 38, 39, 40, 46, 48, 50,

अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 41 हजार 561

अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेले प्रभाग क्र. 1 आणि 14.

असा असेल प्रभाग रचना अंतिम करण्याचा कार्यक्रम

मंगळवार 1 फेब्रुवारी – प्रारूप प्रभाग रचना हरकती व सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणे.
सोमवार 14 फेब्रुवारी – हरकती व सूचना मागविण्याची अंतिम तारीख.
शनिवार 16 फेब्रुवारी – हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे.
बुधवार 26 फेब्रुवारी – हरकती व सूचनांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी घेण्याची अंतिम तारीख.
2 मार्च – हरकती व सुचनांवरील सुनावणी नंतर विवरणपत्र शिफारशीसह निवडणूक आयोगाला सादर करणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *